पाथर्डी - कालपासून तालुक्यातील करोडी येथे लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी टॅंकर सुरू
करावेत, रोजगार हमीची कामे,
चारा डेपो, जनावरांच्या छावण्या, सुरू कराव्यात, वन्यप्राणी, पक्षी
यासाठी पाठवठे सुरू करावेत आदी मागण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत
कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.
भीषण पाणीटंचाई व भयानक दुष्काळाच्या झळा आता पाथर्डी तालुक्यात
चांगल्याच जाणवु लागल्या असुन तालुक्यातील जनता आता विकासाच्या कामाऐवजी प्यायला
पाणी द्या या मागणीसाठी रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे. कमी अधिक प्रमाणात
संपूर्ण तालुक्यात अशीच पाणीटंचाईची भयावह परिस्थिती असल्याने भविष्यात यापेक्षाही
तिव्र परिणाम दिसणार आहेत.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,करोडी गावामध्ये भिषण दुष्काळ आहे
व २०११ च्या जनगनणेनूसार टँकरने पाणी येत आहे. परंतु लोकसंख्येच्या प्रमाणावर
वाढीव टँकर सुरू करावेत.गावात पशुधनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. रोजगार हमी
योजनेमधून दुष्काळ उपाययोजनेची कामे उपलब्ध करण्यात यावी. वनक्षेत्र मोठे असल्याने
जंगली प्राण्यांसाठी वन विभागाने कृत्रीम पाणवठे करावेत. कर्ज वसुली थांबवुन
शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरील पैसे मिळावेत या मागण्यांचा गांभीर्याने विचार
करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला होता मात्र प्रशासनाने दखल न
घेतल्याने आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
यावेळी योगेश गोल्हार, विठ्ठल खेडकर, कुंडलिक खेडकर,
बाळासाहेब खेडकर, भगवान खेडकर, शहादेव खेडकर, दत्तु खेडकर, प्रकाश
गिरी, गोरक्ष टाचतोडे, बाबुराव खेडकर
आदी सहभागी झाले आहेत.
0 Comments