पाथर्डी
- तालुक्यातील वाळुंज गावामध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर
टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणी वाटप करताना टँकर चालकाकडून रहिवाश्यांना
भेदभाव करत पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ संतापले असून चुकीच्या पद्धतीने होत
असलेल्या पाणी वाटपाची चौकशी करण्याची मागणी येथील ग्रामस्थ अॅडव्होकेट सतीश शेळके
यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली
आहे.
उन्हाच्या झळा वाढू
लागल्या तसतसं जमिनीतील पाणी पातळी खोलवर गेल असून परिसरातील पाण्याचे स्रोत आटल्याने
तालुक्यात बहुतांश गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.वाळुंज
गावामध्ये देखील जिल्हापरिषदे मार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी मिळाली
असून रोज सकाळी गावातील वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, मात्र
हा पाणीपुरवठा नियमित व पुरेसा होत असल्याने तसेच टँकरचा चालक जाणीवपूर्वक
ओळखीच्या व्यक्तींना गरजे पेक्षा जास्त पाणीपुरवठा करत असून इतर ग्रामस्थांना
मात्र पाण्या साठी टँकर चालकाची मनधरणी करावी लागत आहे. प्रसंगी चिरीमिरी देखील
द्यावी लागते. याबाबत तात्काळ अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत चौकशी करावी व
टँकर चालकावर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन वाळूंज येथील रहिवासी अॅडव्होकेट सतीश
पांडुरंग शेळके यांनी गटविकास अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
अहमदनगर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
0 Comments