पाथर्डी - पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे
आमदार निलेश लंके हे दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटातुन
आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये सामील झाले. व महाविकास आघाडीच्या पहिल्या यादीतच त्यांचे नाव नगर दक्षिण लोकसभा मतदार
संघासाठी जाहीर करण्यात आले .नगर दक्षिण मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघ व आठ
तालुक्यातील निलेश लंके यांचे तरुणाईवर आसनारे विशेष आकर्षण व लोकसभा मतदार
संघातील वाढता जलसंपर्क पाहता, महायुतीचे आमदार सुजय विखे
यांच्याविरुद्ध निलेश लंके यांनी एक तगडे आव्हान उभे केले आहे .
कर्जत जामखेड तालुक्याचे आमदार राष्ट्रवादीचे
नेते रोहित दादा पवार ,राहुरीचे आमदार प्राजक्त दादा तनपुरे
पाथर्डी चे राष्ट्रवादीचे नेते प्रताप काका ढाकणे श्रीगोंदा तालुक्यातील महाविकास
आघाडीचे विविध नेते मंडळी व महायुती
मधीलही निलेश लंके यांच्यावर प्रेम करणारे अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष व
अप्रत्यक्ष लंके यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे आमदार लंके यांची पारडे नगर
दक्षिण मध्ये जड असल्याचे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे .गेले पाच वर्षात
विद्यमान खासदार सुजय विखे यांनी लोकसभा मतदार संघात केलेले दुर्लक्ष यावर लक्ष
केंद्रीत करत , निलेश लंके हे लोकसभा निवडणुकीच्या
मैदानात उतरले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार
गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील , शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत , काँग्रेसचे
मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रभारी
अंकुश अण्णा काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माता मोहटादेवी गडावर देवीला नारळ
वाढवत या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा प्रारंभ सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी होत
आहे .त्या संदर्भात आमदार निलेश लंके यांनी मतदारसंघातील सर्व पक्षीय प्रमुख
पदाधिकारी ,कार्यकर्ते व हितचिंतकांची रविवारी नियोजन बैठक
घेत त्यांना यात्रे संदर्भात मार्गदर्शन केले आहे . एक एप्रिल रोजी पाथर्डी
तालुक्यातील मोहटादेवी येथून नारळ वाढवून सुरुवात झालेल्या या यात्रेची दिनांक 16 एप्रिल रोजी नगर येथील विशाल गणपतीच्या मंदिरात दर्शन घेत यात्रेची
सांगता करणार आहेत .
संपूर्ण मतदार संघात ही जनसंवाद यात्रा
प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या समस्या व प्रलंबित कामांबद्दलच्या विविध प्रश्न
जाणून घेणार आहे.व यात्रेच्या दिवसभराची सांगता करत त्याच गावात मुक्काम करत
नागरिकांच्या समस्या जाणून घेत दुसऱ्या दिवशी पुढील गावांचा प्रवास करणार आहेत .या
स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने पाथर्डी तालुक्यातून आमदार निलेश लंके
यांच्या समर्थनार्थ पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप काका
ढाकणे यांनी सकाळी नऊ वाजता पाथर्डी ते मोहटादेवी गडापर्यंत मोटरसायकल रॅलीचे नियोजन
केले असून साडेनऊ वाजता मोहटा देवीचे दर्शन घेत महाविकास आघाडीच्या प्रमुख
नेतेमंडळींच्या उपस्थितीत देवीला नारळ वाढवत यात्रेचा शुभारंभ करणार आहेत. निलेश
लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित स्वाभिमान जनसंवाद
यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी व 16 एप्रिल पर्यंत सदर यात्रेत सामील
होण्यासाठी निलेश लंके यांच्यावर प्रेम करणाऱ्या विविध पक्षातील मान्यवर पदाधिकारी
व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे
जिल्हाध्यक्ष कारभारी पोटघन मेजर यांनी केले आहे .
0 Comments