पाथर्डी - कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अत्यंत गोपनीयता बाळगत शुक्रवारी सायंकाळी श्रीक्षेत्र भगवानगड येथे भेट देऊन महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्याशी चर्चा केली. सद्य राजकीय परिस्थिती पाहता मुंडे यांच्या दौऱ्याने राजकीय अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
स्थानिक प्रशासनाला सुद्धा दौऱ्याची पुसदशी कल्पना देण्यात आली. दौरा खाजगी आहे असे सांगण्यात आले. धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पंकजा मुंडे महायुतीच्या बीड मतदार संघाचे उमेदवार म्हणून भाजप तर्फे घोषित झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात पंकजा मुंडे यांनी तालुक्यातील मोहटादेवी येथे भेट देत निवडणुकीसाठी देवीपुढे प्रार्थना केली. त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले या शक्ती प्रदर्शनाने भारावून जात पंकजा मुंडे यांनी मतदार संघात माणिक दवंडी मार्गे धामणगाव कडा असा प्रवेश केला तेथेही त्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले पाथर्डी शहरात त्यांनी आमदार मोनिका राजळे यांचे कडील जेवणाचा आस्वाद घेतली घेत अभय आव्हाड यांचे घरी प्रसन्न चित्त मनाने उपस्थित नेत्यांना स्वतःच्या हाताने चहा करून पाजला त्याचीही चर्चा बरीच झाली त्यानंतर बरोबर आठ दिवसांनी धनंजय मुंडे भगवानगडावर आले. भगवानगडावर भाषण बंदीचा निर्णय महंतांनी घोषित करण्यावरून पंकजा मुंडे व महंत डॉ. नामदेव शास्त्री यांचे संबंध दुरावले.
काही वर्षांपूर्वी भगवानगडावर धनंजय मुंडे यांच्या गाडीवर काही भाविकांनी दगडफेक केली होती. आडवळणी रस्त्यावरून गाडीने पोलिसांनी धनंजय मुंडे यांना सुरक्षितपणे परत पाठवले. भगवानगडांचे महंत नामदेव शास्त्री यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत ,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यासह विविध पक्षातील नेते, आमदार, खासदारांबरोबर चांगला परिचय आहे. वंजारी समाजाचे आराध्य दैवत म्हणून संत भगवान बाबा, व संत वामन भाऊंकडे बघितले जाते. या दौऱ्याबाबत महंत नामदेव शास्त्री यांच्याकडे चौकशी केली असता धनंजय मुंडे अचानकपणे शुक्रवारी सायंकाळी भगवानगडावर आले. त्यांनी ज्ञानेश्वर मंदिराच्या कामाला भरीव मदत केली असून मंदिराचे बांधकाम पाहण्यासाठी धनंजय मुंडे यांनी भेट दिली. या दौऱ्याचा राजकीय संदर्भ नाही व तसा अर्थही काढू नका असे सांगितले. मात्र राजकीय अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार बीड मतदार संघाचा निकाल पंकजा मुंडे यांच्याबरोबरच धनंजय मुंडे यांचे साठी सुद्धा राजकीय प्रतिष्ठेचा बनला असून परळी विधानसभा मतदारसंघासाठी चे चित्र स्पष्ट करणारा ठरणार आहे. राजकीय रणनीतीबाबत कोणत्या विषयावर मुंडे यांनी शास्त्रीं बरोबर चर्चा केली याचा अंदाज उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर समजणार आहे.
गोपनीय सूत्रानुसार पंकजा मुंडे यांना मनापासून मदत करण्याबाबत ची माहिती धनंजय मुंडे यांनी महंतांना दिली. मुंडे यांनी ज्ञानेश्वर मंदिराच्या कामाची माहिती जाणून घेत महंतांच्या परिश्रमाचे कौतुक केले. संपूर्ण गडाची त्यांनी पाहणी केली. महाप्रसाद गृहात प्रसादही घेतला. भगवान बाबांच्या समाधीची महापूजा केली. विद्यार्थी वसतिगृहामध्ये जाऊन काम पाहिले व त्याबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले. भगवान गडाला सतत सर्वतोपरी सहकार्य करू असे मुंडे म्हणाले. महाराजांच्या कक्षातून विकास कामाची पाहणी करण्यासाठी निघालेले महंत व मुंडे या दोघांच्या चेहऱ्यावर मात्र झालेल्या चर्चेमुळे समाधान दिसत होते. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ही दौऱ्याची कल्पना नव्हती.
0 Comments