पाथर्डी - तालुक्यातील राघुहिवरे येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते व
राष्ट्रवादी कामगार जिल्हा संघटक सचिन होंडे यांना तु आमदार निलेश लंकेंचे काम का
करतो ? म्हणुन
गावातील खा. विखे यांचे कार्यकर्ते उपसरपंच, ग्रामपंचायतचा कामगार व दोन-तीन लोकांनी मला
मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पाथर्डी पोलिसात दिली आहे.
पाथर्डी
तालुक्यातील राघुहिवरे ग्रामपंचायत समोर गुरुवार दि. १८ रोजी सकाळी उभे असताना
येथील जब्बर ज्ञानदेव कुर्हे, गोरख शंकर लबडे तसेच इतर दोन अनोळखी इसम माझ्याजवळ आले व तु आमदार
निलेश लंकेचे काम का करतो ? तु खासदार विखेंचे काम कर असे म्हणत होते, मि त्यांना
समजावुन सांगण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना त्याचा राग आल्याने गोरख शंकर
लबडे याने माझ्या पोटावर व पाठीवर लोखंडी गजाने मारहाण केली. जब्बार ज्ञानदेव
कुर्हे याने धारदार ब्लेडने माझ्या हातावर वार केला. त्यांच्यासोबत असलेल्या दोन
अनोळखी इसमाने मला खाली पाडुन म्हणुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन मला जिवे
मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत मि खाली पडलो असताना जब्बार ज्ञानदेव कुर्हे
याने माझ्या पॅन्टच्या खिशातील नऊ हजार रुपये काढुन घेतले. ते जाताना मला म्हणाले
की, तु
जर लंकेंचा प्रचार केला तर तुझ्यावर छेडछाडीचा गुन्हा आम्ही दाखल करु, मला झालेल्या
मारहाणीमुळे माझ्या कुटुंबाला व माझ्या जिवीतास धोका निर्माण झाला असल्याचे सचिन होंडे यांनी म्हटले आहे, त्यानंतर होंडे
यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनला येऊन या मारहाणीची फिर्याद दिली. पाथर्डी पोलिसांनी
भा.द.वि. ३२७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments