पाथर्डी
– ऐन एप्रिल महिन्याच्या मध्यातच शहरातील
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून पालिका प्रशासनाकडून पिण्याच्या
पाण्याचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने आंदोलनाचा इशारा एका निवेदनाद्वारे पालिका
प्रशासनाला सावता सेनेचे प्रदेश अध्यक्ष ठकसेन तुपे यांनी दिला.
शहरातील
आदर्शनगर भागाला जानेवारी महिन्यापासून
नळाचे पाणी येत नाही. पाथर्डी नगरपरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पाणीपुरवठा
विभागाचे अभियंता यांना अनेक वेळा नगरपरिषद मध्ये जाऊन आदर्श नगर मधील नागरिक पाणी
प्रश्नासाठी जाऊन भेटले असता हे दोन्ही जबाबदार आधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात
आणि पोकळ आश्वासन देऊन नागरीकांना परत पाठवतात असे जवळपास साडेतीन महिन्यांपासून
चालू असून ऐन दुष्काळ परिस्थीतीत उन्हाळ्यात आदर्श नगरला पिण्यासाठी पाणी
नाही. तसेच नगरपरिषद ची पाणीपट्टी भरून
देखील नगरपरिषदेचे पाणी मिळत नसल्यामुळे येथील रहिवाश्यांना पाण्यासाठी आर्थिक भार
सोसावा लागत आहे. तीन महिन्यांपासून आंनद कॉलेजच्या मुख्य कार्यालय च्या भिंती
मधून पाच इंच पाण्याची पाइपलाइन फुटली असताना त्याकडे सुध्दा नगरपरिषदे कडून
दुर्लक्ष केले जाते. अनेक ठिकाणी पाइपलाइन लिकेज असून देखील त्याकडे पण लक्ष दिले जात नाही. जर या आठवड्यात आदर्श नगर
भागाला नगरपरिषदने पाणी सोडले नाही तर या विभागातील जनता आक्रमक भुमिका घेऊन
नगरपरिषद समोर रितसर निवेदन देऊन घागरफोडो आंदोलन केले जाईल असा इशारा सावता
सेनेचे प्रदेश अध्यक्ष ठकसेन तुपे यांनी दिला.
यावेळी नवनाथ
शिरसाठ, संतोष
ढाकणे, मुरलीधर
ढाकणे, नागेश
खेडकर, नारायण
खेडकर, छबुराव
रोडे, रामेश्वर
गोसावी, कारभारी
खेडकर, अंकुश
खेडकर व इतर रहिवासी उपस्थित होते.
0 Comments