पाथर्डी
- अहिंसा सत्य,अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य अनेकांतवाद या भगवान महावीरांच्या
तत्वज्ञान व विचारांचा जागर व वापर पदोपदी व्हावा तरच महावीर जन्म कल्याणक साजरे
करण्याचे सार्थक होईल. महावीरांचे तत्वज्ञान संपूर्ण जगातील मानवाच्या कल्याणासाठी
व विश्व शांतीसाठी आहे. अहिंसा,
अनेकांतवाद, अपरिग्रह, दया, क्षमा, दान, तप, शील, चारित्र्य हे ग्रंथातील शब्द ग्रंथात न वाचता
प्रत्यक्ष जीवनात अनुसरावेत. असे प्रतिपादन घोडनदी शिरूर येथील जेष्ठ स्वाध्यायी
पारसमल बांठिया यांनी केले.
पाथर्डी जैन
स्थानकात महावीर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्याना प्रसंगी ते बोलत होते. येथील श्री
वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ,
श्री महावीर युवा मंच व पार्श्वनाथ दिगंबर जैन
मंदिर ट्रस्ट, सकल जैन समाज यांच्या वतीने श्री भगवान महावीर जयंती जन्मकल्याणक
सोहळ्यानिमित्त महावीर स्वामींच्या प्रतिमेची शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात
आली. युवक युवतींच्या ढोलताशा पथकाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
सकाळी
राष्ट्रवादी ( शरद पवार ) चे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे, पाथर्डी पोलीस
स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक विशाल जाधव यांच्या हस्ते
मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चोरडिया, सुरेश गुगळे, राजेंद्र मुथा, आनंदकुमार
चोरडिया, सतीश
गुगळे, महावीर
युवा मंचचे सुनील (सोनू) गुगळे,
अजय भंडारी, संजय शेटिया, संतोष पटवा धीरज गुंदेचा, चांदमल देसर्डा
विजय लुनावत, अभय गांधी आदी उपस्थित होते. मिरवणुकीत महिलांची संख्या लक्षणीय
होती.
आंबेडकर चौकात
आमदार मोनिकाताई राजळे यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. तर अजंठा चौकात माजी
नगराध्यक्ष अभय आव्हाड, राष्ट्रवादीचे योगेश रासने येथे शोभायात्रेत सहभागी झाले. गांधी
चौकात माजी नगरसेवक रामनाथ बंग व माहेश्वरी युवक मंडळांने शोभायात्रेचे स्वागत
केले.
युवकांच्या
ढोलताशा पथका मुळे शोभायात्रेतील वातावरण उत्साही व भक्तिमय झाले होते. मिरवणुक
नवीपेठ, कोरडगाव
चौक, नाईक
चौक, अजंठा
चौक, क्रांती
चौक, गांधी
चौक मार्गे नवीन जैनस्थानका जवळ विसर्जित करण्यात आली. त्यानंतर जैन स्थानकात
मुख्य कार्यक्रम पार पडला. मिरवणूक मार्गावर ऑल इंडिया जैन युथ फेडरेशन, गुगळे गुंदेचा
परिवार, बाहेती
परीवार वतीने शरबत व थंडाईचे वाटप करण्यात आले. यानिमित्त राममंदिरात सुशिलकुमार
पटवा यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रतिभा बहु मंडळ, सुविधी मंडळ, आनंद पाठशाळा
यांनी ही रात्री शानदार कार्यक्रम सादर केले. जन्म कल्याणक महोत्सवानिमित्ताने तीन
दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
0 Comments