चौंडीतून वंचित बहुजन व ओबीसी बहुजन पार्टीच्या प्रचारास सुरवात !


नगर - वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीचे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार दिलीप कोंडीबा खेडकर यांच्या प्रचारास जामखेड तालुक्यातील चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास अभिवादन करून सुरुवात करण्यात आली.

ओबीसी मराठा आरक्षण या वादात ओबीसी आरक्षणाच्या बाजूने मागील सहा महिन्यापासून सातत्याने कार्यरत असलेले माजी प्रशासकीय अधिकारी दिलीप कोंडीबा खेडकर यांना वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी या दोन पक्षाने संयुक्त उमेदवारी दिलेली असून त्यांच्या प्रचाराची सुरुवात आज ज्यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर असे नाव दिले त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेलं चौंडी या ठिकाणावरून त्यांनी सुरुवात केली. कर्जत तालुक्यातील मांदळी येथील आत्माराम महाराज या ठिकाणी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर अहमदनगर जवळच असलेल्या मुकुंद नगर येथील हजरत शहा शरीफ दर्गा चादर अर्पण करून नंतर भटक्या विमुकताची पंढरी मढी येथे कानिफनाथ महाराजां च्या समाधीचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रचार दरम्यान वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार दिलीप कोंडीबा खेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण भटक्या विमुक्त राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अरुण जाधव शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल नगर तालुका अध्यक्ष आम्ही भाई शेख अरविंद साळवे महासचिव योगेश साठे दादासाहेब पाडवे संतोष जयस्वाल योगेश गुंजाळ उद्धव खेडकर विष्णू खेडकर दिलीप दुकानदार दादासाहेब ढाकणे दीपक ढाकणे प्रल्हाद कीर्तने बबन रोकडे आतिश पारवे गोकुळ खेडकर आजिनाथ दहिफळे सोमनाथ तुकाराम पवार लखन पारसे नंदकुमार गाडे गोधड समुद्र विकास समुद्र संजय शेलार बाबुराव फुलमाळी कुंदन शेलार सचिन गायकवाड एकनाथ खेडकर अनिल समुद्र आजिनाथ जायभाय मयूर मोहोळ माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल नाना खेडकर तुकाराम खेडकर नारायण खेडकर भारत खेडकर असे प्रमुख कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते.

मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये माधव पॅटर्न राबवण्याच्या दृष्टीने अनेक वेळेस चर्चा झाली परंतु निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा पॅटर्न पाहिजे तसा आजपर्यंत राबविण्यात आला नाही. परंतु ओबीसी आरक्षणाच्या निर्माण झालेल्या प्रश्नावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज एकत्र येताना दिसतोय. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकूण मतदानाच्या 19 लाखापैकी साधारणता 14 लाख मतदार हे ओबीसी आणि वंचित घटक आहेत.

Post a Comment

0 Comments