पाथर्डी
– ओबीसी वंचित बहुजन पुरस्कृत उमेदवाराची घोषणा
अहमदनगर दक्षिण मतदार संघातून होवून उमेदवार दिलीप खेडकर यांच्या यंत्रणे कडून नगर
दक्षीण मतदार संघात जोरदार ओबीसी मतदार संपर्क अभियान राबवले जात असून भाजपची हक्काची
समजली जाणारी व्होट बँक म्हणजे ओबीसी (मा.ध.व) आता आपली वेगळी चूल मांडत असल्याने
येत्या कालावधीत जिल्ह्याच्या प्रस्थापित राजकारणात मोठी उलथा पालथ होण्याची शक्यता
राजकीय विश्लेशका कडून वर्तवली जात आहे.
लोकनेते गोपीनाथ
मुंडे यांनी राज्यात ओबीसी अर्थात माधव फॉर्मुल्याचा वापर करत राज्यातील ओबीसी
बहुल मतदारसंघात भाजपचा झेंडा उंचावत ठेवला होता. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या
निधनानंतर ओबीसी नेतृत्वात विचलीतपणा येवून छगन भुजबळ यांनी ओबीसींचे नेतृत्व पुढे
फुलवत ठेवले मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मराठा समाजाने ओबीसी मधून आरक्षनाची मागणी
केल्याने ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटला त्यातच पंकजा मुंडे यांनी त्यावेळी
झालेल्या ओबीसींच्या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने ओबीसी मध्ये अस्वस्थता पसरली ही
पार्श्वभूमी असताना अहमदनगर दक्षिण मतदार संघातून यापूर्वीचे खासदार हे भाजपा चे
सुजय विखे तसेच राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे)
इंडिया आघाडीचे निलेश लंके हे दोन्ही उमेदवार मराठा असल्याने नगर दक्षीण मतदार
संघात बहुसंख्य असलेल्या ओबीसी मतदारातून ओबीसी उमेदवार असावा अशी मागणी जोर धरत
होती. हीच बाब हेरून प्रकाश अण्णा शेंडगे व टीपी मुंडे यांनी ओबीसी बहुजन वंचित
आघाडी पक्षाची स्थापना केली व अहमदनगर दक्षिण मतदार संघातून ओबीसी उमेदवाराची ऐनवेळी
घोषणा केली.
ओबीसी पक्षाकडून
जिल्हाभर ओबीसी मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी येत्या काळात ओबीसी नेत्यांच्या सभांचे
नियोजन करण्यात आले असून तशा स्वरूपाचा तळागाळातील ओबीसी मतदार जनसंपर्क पक्ष
नेतृत्व व उमेदवार दिलीप खेडकर यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे बहुतांश ओबीसी
हा आपल्या पारंपारिक पक्षाला डावलून ओबीसी पक्षाला मतदान करणार का ? हे येता काळ
ठरवणार आहे ? आणि जर ओबीसी मतदाराने आपल्या पारंपारिक पक्ष असलेल्या भाजपाला
डावलून मतदान केले तर यापूर्वीचा नगर दक्षिण मधला भाजपची व्होट बँक विखुरली जाऊन
भाजपाचा गृहीत मताची आकडेवारी मोठ्या प्रमाणावर खालावली जावून नगर दक्षिण मतदार
संघाच्या राजकीय पटलावर वेगळ चित्र उमटणार आहे असे राजकीय विश्लेषका कडून बोलले जात आहे.
0 Comments