पाथर्डी येथील प्रमोद शिवाजी काठमोरे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. हि पदवी जाहीर झाली आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील तंत्रज्ञान विभागातील, अभियांत्रिकी विद्याशाखेअंतर्गत मेकॅनिकल आणि मटेरिअल्स तंत्रज्ञान मध्ये ट्रायबोलॉजिकल इन्वेस्टीगेशन ऑफ व्हेजीटेबल ऑइल बेस्ड लुब्रिकेंट फॉर मेटल कटिंग अँप्लिकेशन्स या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. त्यांचे संशोधन पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचे आहे. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये सहा संशोधन प्रबंध सादर केले आहेत. डॉ. बी. डी. बच्छाव आणि डॉ. सोमनाथ नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन पूर्ण केले.
0 Comments