अनियमित पाणीपुरवठा निषेधार्थ उलटी घागर,खापर फोडून आंदोलन !

पाथर्डी - शहरासह तालुक्यात एप्रिल महिन्यापासून होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ आज सकाळी पाथर्डी पालिका कार्यालयावर माजी प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर,माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके,माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे यांच्या नेतृत्वा खाली पालिकेवर धडक मोर्चा काढला होता.

वसंतराव नाईक चौकातून मोर्चा पालिका कार्यालयावर पोचला त्यावेळी मोर्चाला सामोरे जाण्यासाठी पालिका मुख्याधिकारी संतोष लांडगे उपस्थित नसल्याने आंदोलक संतप्त झाले यावेळी आंदोलकांनी रिकामा हंडा मुख्याधिकारी यांच्या खुर्चीवर ठेवून घागर फुटलेल्या खापर मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवली.

  • यावेळी निवडणूक संपलेली असताना देखील पाथर्डी तालुका पाण्याविना तडफडत आहे मात्र निवडणुकीत मतासाठी घिरट्या घालणारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे गायब असल्याचा आरोप करत आंदोलकांनी पालकमंत्री विखे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नागनाथ गर्जे यांनी पैठण धरणात पाणी पुरवठा योजनेचा जकवेल असलेल्या ठिकाणी साखर कारखान्याची मळी व रसायन येवून दुषित पाणी होते व नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागते याकडे प्रशासन राजकीय दबावातून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.

यावेळी  किसन आव्हाड, प्राध्यापक सुनील पाखरे, पप्पू बनसोड,सुरेश डोमकावळे,अर्जुन फुंदे,विकास नागरगोजे,सुरेश ढाकणे, मनोज गांधी,कृष्णा पांचाळ,बाळू केळकर,दिलीप आंधळे,श्रीधर हंडाळ,भगवान बांगर,देविदास चव्हाण,सुरेश हुलजुते,सचिन नागापुरे आदींसह कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर ततीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा प्रा.सुनील पाखरे यांनी यावेळी पालिका प्रशासनाला दिला.   

यावेळी पालिका कार्यालयीन अधीक्षक राजभोज यांनी लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येऊन याबाबत प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते यांच्यात सोमवारी प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेणार असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments