पारनेर - माणूस कोणताही, कुठलाही
असो त्याच्या मदतीला धावून जाण्याचा पिंड असलेल्या मा. आ. नीलेश लंके यांची
सामाजिक बांधिकली जम्मूमध्येही पहावयास मिळाली. लोकसभा निवडणूकीनंतर मा. आ. नीलेश
लंके हे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेले असून रविवारी देवीचे दर्शन घेऊन परतत
असताना देवीच्या दर्शनास निघालेले औरंगाबाद येथील देवी भक्त नवनाथ नाथा कोळसे
चक्कर येऊन कोसळले. त्याच वेळी नीलेश लंके व त्यांचे सहकारी तिथे पोहचले. लंके
यांनी पुढाकार घेत तात्काळ रूग्णवाहिकेची सोय करून चार किलोमीटर अंतरावरील
रूग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढे कटारा येथील रूग्णालयात त्यांना
दाखल करण्यात आले.
रूग्णालयातील
डॉक्टरांशी कोळसे यांना कशामुळे चक्कर आली असावी ? त्यांच्यावरील
उपचारानंतर त्यांची प्रकृती कधी सुधारेल ? आदींबाबत चर्चा
केली. काळोखे यांच्या नातलगांशी संपर्क करून झालेल्या घटनेची माहितीही लंके यांनी दिली. कोळसे
यांच्यावर उपचार सुरू केल्यानंतर ते उपचारास प्रतिसाद देऊ लागल्यानंतर लंके हे
पुढील प्रवासासाठी निघाले. लंके यांच्या समवेत अनिल गंधाक्ते, कांतीलाल भोसले, सचिन गवारे, सचिन
कराळे हे नीलेश लंके प्रतिष्ठानचे सदस्य होते.
लंके हे नेहमीच
वैष्णादेवीच्या दर्शनासाठी कटारा येथे जातात. त्यामुळे त्यांची या भागातील हॉटेल
व्यवसायीक तसेच स्थानिक नागरीकांशी थेट ओळख आहे. लंके कटारा येथे पोहचल्यानंतर
आमच्याच हॉटेलमध्ये थांबा असा हॉटेलचालकांचा आग्रह असतो. लंके हे सर्वांना संधी देत प्रत्येक वेळी
वेगवेगळया हॉटेलमध्ये थांबतात. लंके यांच्या तेथील संपर्कामुळेच काळोखे हे चक्कर
येउन पडल्यानंतर तातडीने रूग्णवाहीका घटनास्थळी पोहचण्यास मदत झाली.
काळोखेंच्या
नातलगांकडून कृतज्ञता !
काळोखे हे चक्कर
येऊन पडल्यानंतर नीलेश लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने रूग्णवाहिका उपलब्ध
करून त्यांच्यावर कमी कमी वेळेत उपचार सुरू केले. लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या
तप्तरतेविषयी काळोखे यांच्यासह त्यांच्या नातलगांनी कृतज्ञता व्यक्त केली.
हे माझे
कर्तव्यच !
एखादी व्यक्ती
संकटात असेल तर मइ-या मनालाही त्याच्या वेदना होतात. त्यामुळे मी कुठेही असलो तरी
संकटात असलेल्या व्यक्तीच्या मदतीला धावून जातो. संकटात सापडलेल्या, आडलेल्या व्यक्तींना मदत करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. त्यामुळेच
कोठेही जा माझा दांडगा लोकसंपर्क निर्माण झाला आहे व तीच माझी संपत्ती आहे. असे मा.आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.
0 Comments