कडा - येथील मंगल कार्यालयात लग्न सोहळ्यात
पाहूण्यांची लगबग चालू असतानाच, अज्ञात
चोरट्यांनी लग्न समारंभात प्रवेश करुन नववधूच्या सोन्याच्या दागिन्यांसह नगदी
पंचवीस हजाराची रक्कम लांबविल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या
सुमारास कड्यात घडली.
कडा येथील प्रविण मंगल कार्यालयात गुरुवार दि.
२ मे रोजी दुपारी १२.३६ वाजता येथील सामान्य कुटुंबातील बाळासाहेब धोंडीबा पवळ
यांचे चिरंजिव शुभम् पवळ व कुंभारगाव ता. करमाळा येथील हनुमंत भगवान जाधव यांची
कन्या प्रतिक्षा जाधव यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या लग्न
सोहळ्यासाठी वधू- वरांकडील व-हाडी मंडळींची लगबग सुरु असतानाच अज्ञात चोरट्यांनी
मंगल कार्यालयात प्रवेश करुन नववधूच्या अंदाजे तीन साडेतीन तोळ्याच्या सोन्याच्या
दागिन्यांसह पिशवीत ठेवलेल्या रोख पंचवीस हजार रुपयााची रक्कम लांबविल्याची घटना
गुरुवारी भरदुपारी कडा शहरातील मंगल कार्यालयात घडली. अचानक चोरीची घटना घडल्याने
दोन्हीकडील व-हाडी मंडळी अक्षरश: हवालदिल झाली होती. सदर चोरीची घटना घडल्यानंतर
उपस्थितांनी चोहीकडे चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू तोपर्यंत
चोरट्यांनी मंगल कार्यालयातून पोबारा केला होता. ज्या मंगल कार्यालयात लग्न सोहळा
आयोजित करण्यात आला होता,
त्याठिकाणी सीसीटीवी कॅमेरे नसल्यामुळे
आता चोरट्याचा शोध घेणे आष्टी पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.
0 Comments