पाथर्डी - विश्वविनायक मल्टीस्टेट आयोजित विश्वसंकल्प स्नेहमिलन २०२४ कार्यक्रम मोठ्या उत्साहात विश्वविनायक लॉन्स येथे सहकार तज्ञ डॉ.शेखर
बो-हाडे यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.
यावेळी
विश्वविनायक मल्टीस्टेट चेअरमन मोदक शहाणे, साई
सोल्युशन कन्सल्टन्सीचे अशोक पागिरे,धीरज मैड (नरहरी
उद्योग समूह),सोमनाथ सोनवणे (लेखापरीक्षक) व्यंकटेश मल्टीस्टेटचे सीईओ मंगेश देहेडकर,
कायदेशीर सल्लागार अँड. हरिहर गर्जे ,सुनील
प्रभाकर शहाणे व अनिल उदावंत आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. शेखर बोराडे यांनी
सहकाराची वाटचाल आणि भवितव्य या विषयावर बोलताना, सहकारामध्ये
किंवा सहकार क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी निर्माण करण्याचे ताकद आहे. भारत
महासत्ता होण्यासाठी
सहकाराक्षेत्राचे मोठे योगदान असणार आहे
असे भाकीत डॉ. शेखर बोराडे यांनी केले आहे. यावेळी विश्वसंकल्प कार्यक्रमात विश्वविनायक मल्टीस्टेटमध्ये
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचारयांचा गुणगौरव करून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस
वितरण करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल भोसले यांनी तर मान्यवराचे
आभार शंकर शिरसाठ यांनी मानले.
0 Comments