कड्यातील मतदान केंद्रांची तहसीलदारांकडून भेट देऊन पाहणी

 


कडा / वार्ताहर

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी रविवारी कडा येथील मतदान कक्षाला भेटी देऊन पाहणी केली. तसेच तेथील केंद्राध्यक्षांसह कर्मचा-यांच्या अडचणी जाणून घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना सुचना केल्या.  

   लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार दि. १३ रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी रविवारी सायंकाळी आष्टी तालुक्यातील कडा येथील पिंक बुथसह एकूण नऊ मतदान कक्षांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी गायकवाड यांनी प्रत्येक बुथवरील निवडणूक केंद्राध्यक्षांसह कर्मचा-यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधित यंत्रेनेला सुचना केल्या आहेत. तसेच नागरीकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन लोकसभा निवडणुक शांततेत व सुरुळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी अव्वल कारकुन भगीरथ धारक, मंडाळाधिकारी शरद शिंदे, कडा येथील तलाठी राऊत नाना आदी कर्मचारी उपस्थित होते.

--------%%------

Post a Comment

0 Comments