तब्येत कशी काय आहे? कसे चालले तुझे? अशी ख्याली-खुशाली विचारीत २६ वर्षानी भेटलेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न!


करंजी (प्रति)- "अरे तु तर ओळखु सुध्दा येईना? तुझे कसे काय चाललय, मुले काय करतात ? सध्या रहायला कुठे आहेत? तब्येत कशी काय आहे? अशी ख्याली-खुशाली विचारीत तब्बल २६ वर्षांनी एकमेकाला भेटण्याचा योग माजी विद्यार्थ्यांना करंजी येथील नवनाथ विद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात आला. 

             पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयात ९७-९८ साली एकाच वर्गात शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्याचा "आठवण मैत्रीचा" स्नेहमेळावा येथील नवनाथ विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तब्बल २६ वर्षानी एकमेकांना भेटल्यावर या माजी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आपल्या सुख-दुःखाचे कथन करुन एकमेकांची ख्याली- खुशालीची चौकशी करताना त्यांना आपण परत एक दिवस शालेय जिवनात आल्याचा भास होत होता. आज डाॅक्टर, इंजिनिअर, उद्योगपती, सैनिक, सरकारी नोकरीस तसेच शेती करणारे या बॅचचे विद्यार्थी दिवसभर आपली सगळी सुख-दुःख विसरुन गेली होती. त्याकाळातील हे विद्यार्थी आज मात्र जबाबदार नागरिक झाले होते. परंतु "आठवण मैत्रीचा" या स्नेहसंमेलनामुळे आपले शालेय जिवन आठवत होते. दिवसभर चाललेल्या या स्नेहमेळाव्यात प्रत्येकाने आप-आपली ओळख व परिचय करुन दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनाथ विद्यालयाचे प्राचार्य संजय म्हस्के हे होते तर बबन अकोलकरसर, डि. व्ही. अकोलकरसर, बंदरकरसर, बन्सी लवांडेसर, सौ. कल्पना जिवडे मॅडम, पवार गुरुजी, सौ. शांता अकोलकर मॅडम आदि शिक्षक प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी अंध गायक जगन्नाथ लोखंडे यांनी स्वागतगीत सादर केले.

                     या कार्यक्रमास विजय कारखेले,डाॅ. नितीन रांधवणे, कानिफ शिंदे, संतोष शिंदे, राजु आठरे, दिलीप शिंदे, भिवसेन टेमकर, विष्णु टेमकर, मराठेसर, बाळासाहेब टेमकर, कापडे दशरथ, गणेश शिंदे, जगन्नाथ लोखंडे, निलेश साखरे, देविदास टेमकर, शितल बोरा, मनिषा बोरुडे, सुजाता शिंदे, कावेरी अकोलकर, रजिया मणियार, सविता दानवे, सारिका पाठक, मनिषा पाठक, सविता अकोलकर, कविता घोरपडे, संतोष क्षेत्रेसह अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी हजर होते. विजय कारखेले गुरुजी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या खास शैलीत केले.

Post a Comment

0 Comments