कडा/ वार्ताहर
--------------------- गहिनीनाथ गडाचे मठाधीपती ह.भ.प. विठ्ठल महाराज यांच्या गाडीला बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याने या अपघातात हभप विठ्ठल महाराज जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून महाराजांच्या पायाला मार असल्याचे सांगण्यात येते.
गहिनीनाथ गडाचे मठाधिपती हभप विठ्ठल महाराज बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास गडावरून कार्यक्रमासाठी पाथर्डीकडे निघाले होते. त्यांची गाडी खरवंडीजवळ आली असता त्यांच्या गाडीच्या समोरील टायरपैकी एका टायर चालत्या गाडीत फुटले. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या खाली उतरून एका दगडाला धडकली. या अपघातात विठ्ठल महाराजांच्या पायाला दुखापत झाली. त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ नगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
0 Comments