राजेंद्र जैन / कडा - सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून परिचित असलेल्या कडा येथील हजरत मौलाली बाबांच्या यात्रेनिमित्त आज शुक्रवार दि. २४ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या आखाड्यात राज्यातील नामांकीत मल्ल हजेरी लावणार असून, या मध्ये दोन लाख रुपये इनाम असलेली मानाची कुस्ती होणार आहे.
कडा येथे गुरुवारपासून हजरत मौलाली बाबा यात्रेची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शुक्रवारी कुस्तीच्या फडाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये संग्राम पाटील विरुद्ध सुदर्शन कोतकर ही दोन लाख रुपयांची , अरविंद पाटील विरुद्ध मयूर कणसे ही एक लाख रुपयाची कुस्ती होणार आहे. इतर मल्ल देखील या कुस्ती आखड्यात हजेरी लावणार आहेत. या कुस्तीच्या फडाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने तसेच सरपंचपूत्र युवराज पाटील, उपसरपंच बाळासाहेब कर्डीले व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments