अठ्ठावीस वर्षानंतर कड्याच्या शाळेची घंटा वाजली


कडा -अठ्ठावीस वर्षानंतर पुन्हा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या शाळेची घंटा ‌वाजली. पुन्हा सर्व मुले- मुले त्या प्रांगणात बसली. मात्र ही मुले कोणी पाचवी-सहावी वर्गातील नव्हती. तर अठ्ठावीस वर्षापुर्वी इयत्ता दहावीमधून शिकुन गलेले होते. विशेष म्हणजे पंचवीस वर्षानंतर प्रथमच एकमेकांना भेटल्यानंतर या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिल्याचे ह्दयस्पर्शी चित्र पाहायला मिळाले.                                                                                      आष्टी तालुक्यातील कडा येथील अमोलक जैन शिक्षण संस्थेच्या मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या सन: १९९६ सालच्या इयत्ता दहावीच्या माजी शेकडो विद्यार्थ्यांचा शनिवार दि. २५ मे रोजी स्नेहमिलन मेळावामोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांसमवेत झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणा-या विद्यार्थ्यांनी जुन्या स्मृतींना उजाळा देत पुन्हा एकदा विद्यार्थीदशेत गेल्याचा सुखद अनुभव दिला. कोठारी विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू, ओठावर हसू आणि मनात अभिमानाची भावना दिसून आली. या स्नेमिलन मेळाव्यात तब्बल १२० शालेय संवगडी माजी विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.

-------%%--------

शैक्षणिक वर्ष 1996 या बॅचच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची गेट-टुगेदर च्या निमित्ताने तब्बल 28 वर्षांनी भेट झाली. शाळेत आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.  सर्व माजी विद्यार्थी आता करिअरच्या दृष्टीने स्थिरस्थावर असल्याने भविष्यात शाळेच्या प्रगतीत वाटा उचलणे आणि इतर काही समाजोपयोगी उपक्रम यासाठी  सहयोग देणे याचीही या गेट टू गेदर निमित्ताने चर्चा झाली. 

*अर्चना राऊत ( गवळी )* सहायक शिक्षिका , पिंपरी चिंचवड महानगरपालिका

-------%-----------

गरजूंना मदतीचा संकल्प....

---------------

सोशल मीडियाच्या माध्यमातून अठ्ठावीस वर्षानंतर स्नेह मिलन कार्यक्रमाच्या निमित्त एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देतानाच, ज्या आपल्या वर्गमित्रांची परिस्थिती हलाखीची आहे, किंवा त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्या संवगड्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचा संकल्प आम्ही सर्व मित्रांनी केला.

- संदिप खाकाळ, माजी विद्यार्थी

-----------%%------

Post a Comment

0 Comments