मुंडे यांच्या बदनामीचा खा. लंके कडून निषेध !


पाथर्डी – शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात माता-भगिनींविषयी अपशब्द वापरले जात असतील तर ती अत्यंत अशोभनीय व निंदनीय गोष्ट आहे. कोणत्याही बाबतीत सामाजिक तणाव, जातीवाद, वाईट टीका टिपणी योग्य नाही. निवडणुकीत झाले गेले गंगेला मिळाले, सर्व हेवेदावे सोडून द्या,सोशल मीडियावर लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करून स्टेटस ठेवून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन होत असलेल्या टीकेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत पोलिसांनी अश्या समाज विघातक प्रवृत्तीवर कडक कार्यवाही करावी असे खासदार निलेश लंके सांगितले.                                       

लोकनेते पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध तालुक्यातील शिरापूर येथील एका व्यक्तीने आक्षेपार्ह लिखाण करत स्टेटस ठेवले. अन्य व्यक्तींकडून वाईट शब्दांमध्ये कमेंट केल्या जात आहेत. त्यावरून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सामाजिक तणाव वाढला आहे.  परळी एवढाच प्रभाव मुंडे कुटुंबाचा पाथर्डी वर असून वंजारी समाजाच्या मतदारांची संख्या खूप मोठी आहे. शुक्रवारी पाथर्डी बंद ठेवून मुंडे समर्थकांनी सामाजिक एकतेचे मोठे शक्ती प्रदर्शन करत मोर्चा काढला. मुंडे समर्थक आक्रमक कार्यकर्त्यांनी बंद दरम्यान संपूर्ण शहरभर गस्त ठेवली होती. 

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शुक्रवारीच खासदार निलेश लंके यांचा नागरिक सत्कार प्रताप ढाकणे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.  पंकजा मुंडे यांच्या बदनामी प्रकरणावरून तालुक्यात झालेले अशांत व संवेदनक्षम वातावरण पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा लोक भावनेचा आदर करत खासदार लंके यांची विजयी मिरवणूक रद्द केली.  भव्य प्रमाणावर आयोजित सत्कार कार्यक्रम साधेपणाने घेत पंकजा मुंडे यांचे विरुद्ध सुरू असलेल्या लेखनाचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसने लोक भावना जपत केलेला जाहीर निषेध मुंडे समर्थकांना आपलेपणाचा वाटला.

नगर मतदार संघात भाजपच्या विद्यमान खासदारांचा पराभव केल्याचे वातावरण ताजे असताना राजकीय विचारांची जोडे बाजूला ठेवत खासदार निलेश लंके यांचे कडून भाषणातून मुंडे प्रकरणाविरुद्ध झालेला निषेध राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला आहे.दरम्यान खासदार लंके यांनी पाथर्डी दौऱ्यात मुख्य कार्यक्रमानंतर श्री क्षेत्र मोहटादेवी व श्री क्षेत्र भगवान गडावर जाऊन दर्शन घेतले लंके यांचा दौरा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरला.                       

  

Post a Comment

0 Comments