पाथर्डी - अमरापुर ता. शेवगाव येथे गोवंश प्राण्यांचे मांस घेऊन जाणाऱ्या दोन इसमांकडुन गोवंश प्राण्यांची कातडी व गोवंश मांस, दोन मोटर सायकल असा सुमारे चौसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला, तसेच या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पाथर्डी पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली. पाथर्डी तालुक्यातील सुसरे गावाच्या शिवारात दोन इसम राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असतानाही अनधिकृत पणे गोवंश मांस व इतर अवयव विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन चालले असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत गोरक्षक
ज्ञानेश्वर सातपुते यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी विविध
कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुसरे
गावातील काही जागरूक नागरिकांना या अवैध तस्करी विषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी
ती गाडी अडवून तालुक्यातील गोरक्षकांना
यांची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर इसमांकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता, त्याने मन्सुरगणी बेग सोनविहीर ता. शेवगाव व अब्बास अमीन सय्यद रा.
आखेगाव ता. शेवगाव असल्याचे सांगत आखेगाव येथुन गोवंश प्राण्याचे मांस अमरापुर
येथे विक्रीस नेत असल्याचे सांगितले. त्यानंतर, मुद्देमाल
ताब्यात घेत, पोलिसांनी गुन्हा दाखल करून, बेग व सय्यद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून, त्यांना अटक केली.
महाराष्ट्र
राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही मागील काही दिवसांपासून पाथर्डी व
शेवगाव तालुक्यातील काही समाजकंटक मुद्दामहून गोमातेची हत्या करून हिंदूंच्या
भावना दुखावण्याचे काम करीत आहेत. एकीकडे पाथर्डी सारख्या ठिकाणी मुस्लिम समाजातील
काही तरुण गोरक्षणाचे काम करत असताना काही समाजकंटक मात्र मुद्दामहून समाजात द्वेष
पसरवण्यासाठी असे काम करीत आहेत. अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर पोलीस
प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी व सामाजिक सलोखा अबाधित राहील याची काळजी
घ्यावी असे मुकुंद गर्जे, गोरक्षण समिती प्रमुख पाथर्डी यांनी
सांगितले.
0 Comments