पाथर्डी - रात्री उशिरा पाथर्डी वरून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसचा स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे बस शेजारच्या वाहनावर जाऊन आदळल्याने बसला भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात बस चालक सतीश वारे व वाहक संभा जायभाय गंभीर जखमी झाले असून बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत मात्र बस चालक सतीश वारे हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवले आहे..
गेल्या अनेक वर्षापासून पाथर्डी बस आगारातील बस नादुरुस्त असल्याकारणाने ठिकठिकाणी बंद पडत होत्या त्याबाबत महामंडळाची कर्मचारी व प्रवाहाची प्रवासी संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी प्रशासनाची लक्ष वेधण्याचे काम केले होते मात्र त्याबाबत महामंडळाने ठोस अशी पावले न उचलल्याने वारंवार बसेस बंद पडणे व अपघातांना सामोरे जावे लागणे अशा घटना घडत आहेत याशिवाय बस आगारातील नादुरुस्त व जुनाट बसेस मुळे प्रवासी देखील पर्यायी मार्गाचा वापर करत असल्याने एसटी महामंडळाला अप्रत्यक्षरीत्या मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
0 Comments