मुंडे यांच्या पराभवामुळे तरुणाची आत्महत्या !


 कडा / वार्ताहर-लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा झालेला निसटता पराभव जिव्हारी लागल्याने चिंचेवाडी येथील मुंडे समर्थक असलेल्या एका तरूणाने गळफास घेऊन जिवन संपवल्याची घटना मंगळवारी दि . ११ जुन च्या रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडली. पोपट वायभासे असे मृत तरूणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील अशी ही दुसरी घटना असून यापूर्वी ९ जून रोजी अंबाजोगाई येथील युवकानेही मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने जीवन संपवले होते.

आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट मधुकर वायभासे ( वय ३७) हा तरूण मुंडे समर्थक होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने तो नाराज झाला . पराभव झाल्यापासून तो सारखा विचारात होता. मंगळवारी रात्री त्याने कोणाला काही एक न बोलता चिंचेवाडी शिवारात जाऊन एका झाडाला गळफास घेऊन जिवन यात्रा संपवल्याची घटना घडली. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शोकाकुल वातावरणात बुधवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकाराने चिंचेवाडी गावांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Post a Comment

0 Comments