पाथर्डी – तालुक्यातील करोडी ते टाकळी मानुर या दरम्यानच्या
रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरु असून या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय
चौकशी करून संबधित ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी रास्ता रोको आंदोलना करण्यात
येणार असल्याचे निवेदन तिनखडीचे सरपंच बाळासाहेब खेडकर यांनी तसेच आम आदमी पक्षाचे
किसन आव्हाड यांनी प्रांताधिकारी प्रसाद मते तसेच कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री
ग्रामसडक योजना विभाग यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत
करोडी ते टाकळी मानुर या रस्त्याचे काम सुमारे ८ कोटी रुपये खर्च करून सुरू असून सदर
काम हे ठेकेदार मनमानीपणे करत असून मूळ अंदाजपत्रकाप्रमाणे काम केले जात नाही तसेच
या कामावर देखरेख करण्यासाठी शासनाचा अभियंता त्या ठिकाणी कधीही उपस्थित असल्याचे
दिसत नाही,त्यामुळे रस्ता कामाचे त्वरित सोशल ऑडिट करून निकृष्ट झालेले काम पुन्हा
नव्याने करण्यात यावे तसेच ठेकेदारावर आणि संबंधित अभियंत्यावर योग्य ती प्रशासकीय
दंडात्मक कारवाई करण्यात यावी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वीही दिनांक
३० मे रोजी याच बाबत तक्रार अर्ज केला होता मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही कारवाई
आपण केली नाही म्हणून तत्काळ सदर ठेकेदारावर कारवाई करून पुन्हा नव्याने काम सुरू
करण्यात यावे. अन्यथा या रस्त्याबाबत बुधवार दिनांक १९ जून २०२४ रोजी रोजी सकाळी १०
वाजता टाकळी मानुर परिसरातील ग्रामस्थ सोबत घेऊन करोडी तालुका पाथर्डी या ठिकाणी
राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
0 Comments