शेवगाव
तालुक्यातील वरुर येथील रेवणकर पूर्ण नाव समजले नाही तसेच आखेगाव येथील काटे यांच्या दरम्यान शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशाच्या परताव्याच्या
कारणावरून शेवगाव रोडवरील एका हॉटेलवर जोरदार वादावादी झाली या वादावादीचे रूपांतर
चाकू हल्ल्यात होऊन एका गटांनी दुसऱ्यावर कटर सदृश्य हत्याराने वार केल्याने १ जण
गंभीर जखमी झाला आहे.याबाबत घटनाची घटनेची माहिती कळताच तात्काळ पाथर्डी पोलिसांचे
पथक घटना ठिकाणी दाखल झाले होते मात्र या हाणामारीत एका युवकास गंभीर दुखापत
झाल्याने तो रक्तबंबाळ झाला होता घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी व बघ
यांनी प्रचंड गर्दी केली होती.
शेवगाव तसेच पाथर्डी तालुक्यात व्याजाचा धंदा तेजीत असतानाच हळूहळू शेअर मार्केट मध्ये गुंतवलेल्या गुंतवणूकदाराची एजंटाने मोठी फसवणूक करून पोबारा केल्याचे घोटाळे बाहेर येऊ लागले आहेत. पोलिसात याबाबत फिर्याद दाखल होत नसली तरी एकमेकांवर चाकू हल्ले करण्याइतपत हे प्रकरणे गंभीर होत चालली आहेत. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वेळीच लक्ष घालून आवश्यक कडक कारवाई करणे आवश्यक झाले आहे. अन्यथा येत्या कालावधीमध्ये अशा स्वरूपाच्या घटना घडून जीवितहानी होईल.
0 Comments