पाथर्डी तालुक्यातून पशुधन चोरीच्या घटना वाढल्या !

पाथर्डी - तालुक्यातील दुलेचांदगाव येथे गेल्या काही दिवसापासून अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून १ जून रोजी रात्री शेतकरी सदाशिव सानप यांचे राहते घराचे आवारातून कुलूप तोडून २० हजार रुपये किमतीच्या बकऱ्या चोरट्यांनी चोरून नेहल्या आहेत.

दुलेचांदगाव येथे मागील महिन्यातही मर्दाने कुटुंबाच्या वस्तीवर धाडसी चोरी झाली होती मात्र त्या चोरीचा अद्याप तपास लागलेला नसताना पुन्हा एकदा चोरट्यांनी दुलेचांदगाव येथील गरीब शेतकरी सदाशिव सानप यांच्या राहते घरासमोर शेडमध्ये बांधलेल्या ४ बकऱ्या शेडचे कुलूप तोडून चोरून नेहल्या आहेत. याबाबत सानप यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत. मात्र ऐन दुष्काळात कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवणारे पशुधन चोरीला गेल्याने सानप कुटुंबीय अडचणीत सापडले आहे.


Post a Comment

0 Comments