अबब एस.टी.चालकाचा हात पाय जोडून ड्रायव्हिंगचा थरार !


पाथर्डी - एखाद्या सर्कशीतील विदूषकाला लाजवेल अशा पद्धतीने पाथर्डी आगारातील एसटी महामंडळाचा चालक दोन्ही पाय चालू गाडीमध्ये वरती घेऊन मोबाईल खेळत गाडी चालवतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने राज्य परिवहन प्रवासी वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत संबंधित चालक व पाथर्डी बस आगारातील अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी समाज माध्यमावर जोर धरत आहे.

राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी ही गरिबांची लालपरी म्हणून ओळखली जाते. सध्या लालपरी अनेक संकटातून जात आहे. पाथर्डी शेवगाव तालुक्यातील एसटी महामंडळाची बस स्थानके नूतनीकरणाच्या नावाखाली पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे गेली पाच वर्षापासून खोदून ठेवल्याने बस स्थानके असून अडचण नसून खोळंबा अशा परिस्थितीच्या मगर मिठीत अडकलेली आहेत. त्यातच पाथर्डी आगारातील आगार प्रमुख यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने कर्मचारी मनमानीला अशा पद्धतीने प्रवाशांचे जीव धोक्यात घालून गाड्यांची ने आन करत असतात, बेशिस्तपणा करणे तसेच कर्मचारी व आगर प्रमुख यांच्या दरम्यान असलेल्या कुरबुरी हे प्रकरणे हाताळण्यास आगारप्रमुख आरिफ पटेल हे अपयशी ठरलेले आहेत.

त्यातच आज दुपारी शेवगाव पाथर्डी ला जाणारी येणारी बसचे चालक चक्क गाडी चालवताना दोन्ही पाय वरती घेऊन मोबाईल खेळताना आढळून आले. एका सुज्ञ प्रवाशांने याबाबतचा व्हिडिओ तयार केला असून तो व्हिडिओ अधिराज्य पोर्टलच्या हाती लागला आहे त्याबाबत आगार प्रमुख यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळाली.




Post a Comment

0 Comments