पाथर्डी :- नगर पाथर्डी रस्त्यावरील करंजी घाटामध्ये माणिकशहा पिरबाबा दर्गाजवळील धोकादायक वळणाजवळ दरीमध्ये अंदाजे ३५ ते ४० वय असलेल्या एका पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह रविवारी आढळून आला होता.
सदर इसमाच्या डोक्यावर व छातीवर काहीतरी टणक हत्याराने मारहाण करून त्यांचा खुन करून त्याचे प्रेत करंजी घाटातील खोल दरीत टाकुन देवुन पुरावा नष्ट करण्याचे हेतूने त्याचे प्रेत अर्धवट जाळले आहे. या प्रकरणाने खडबडून जागे झाले असून या घटनेचे गांभीर्याने तपास कार्य सुरू केले आहे याचाच भाग म्हणून आज जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपास यंत्रांना आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक संजय पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. सदर घटनेबाबत पोलिसांनी भा. न्या.स. क्र . १०३(१), २३८ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
या अनोळखी मयत पुरुषाची उंची ५ फूट सहा इंच, रंगाने सावळा, शरीर बांधा मजबूत, केस काळे चेहरा गोल, नाक बसके, अंगात फिकट निळसर रंगाची पॅन्ट व उजव्या हाताच्या कांबीवर पुष्पा असे मराठीत गोंदवलेले आहे असे वर्णन स्थानिक पोलिसांनी सांगितले असून सदर व्यक्ती कोणाच्या ओळखीची असल्यास पाथर्डी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments