सैनिकांचे प्रश्न तातडीने सोडवले जातील – प्रसाद मते


पाथर्डी -  देशसेवेसाठी आयुष्य खर्ची घालनारे सैनिकांचे प्रशासकीय प्रश्न तातडीने सोडवणे ही प्रशासनाची प्रथम जबाबदारी असून तालुक्यातील सैनिकांचे प्रश्न तातडीने सोडवले जातील असे आवाहन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी केले ते जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालय पाथर्डी येथे सैनिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शुक्रवारी दुपारी शासकीय सैनिक मेळाव्याच्या आयोजन प्रसंगी बोलत होते.

यावेळी सैन्य दलातील कार्यरत सैनिक,माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबीयांचे व वीरमाता,वीर पत्नी यांच्या विविध शासकीय कार्यालया मध्ये प्रलंबित असणारे प्रश्न सोडविण्यासाठी प्रांताधिकारी प्रसाद मते व तहसीलदार उद्धव नाईक यांच्या उपस्थिती मध्ये विविध कार्यालयाच्या प्रतिनिधी यांनी सैनिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.
यावेळी तालुक्यातील अनेक सैनिकांचे प्रलंबित विषय प्रांत अधिकारी प्रसाद मते व तहसीलदार उद्धव नाईक यांनी समजून घेवून ते मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. जिल्हा सैनिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या अडचणी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोरडे यांनी समजून घेऊन या संदर्भात तक्रारी अर्ज कशा पद्धतीने करायचे त्याचे मार्गदर्शन उपस्थित सैनिकांना केले.माजी सैनिकांना जिल्हा सैनिक कार्यालयातून मिळणारे शैक्षणीक लाभ, व्यवसायासाठी मिळणारे अनुदान व बचत गटासाठी मिळणारे अनुदान या संदर्भात माहिती दिली.मेळाव्याचे व्यवस्थापन त्रिदल सैनिक संघ पाथर्डीच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोरडे,प्रांत अधिकारी प्रसाद मते,तहसीलदार उद्घव नाईक,सह जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चित्रसेन गडाकुस,त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अंकुश खोटे, जयहिंद फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे,प्रहार संघटनेचे गोरक्ष पालवे,स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा प्रमुख भास्कर मणि,संघटनेचे वकील सचिन बडे व हरिहर गर्जे  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिदल सैनिक सेवा संघ पाथर्डी व अहमदनगर शहर अध्यक्ष गोवर्धन गर्जे यांनी केले.


Post a Comment

0 Comments