'नाना' म्हणजे राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व - महेबुब शेख माजी आ दरेकरांवर हजाराे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव


राजेंद्र जैन / कडा - सध्याचे राजकारण हे सुडाच्या दिशेने वाटचाल करणारे असले तरी नानांनी त्यांच्या आयुष्यात मैत्रीत राजकारण कधीच केले नाही. राजकारण असो की समाजकारण जे ओठात तेच पोटात असणारे स्वच्छ व स्पष्ट नेतृत्व म्हणजे नाना आहेत. सामान्यांशी असलेली नाळ कशी टिकून ठेवाययची हे नानांकडून शिकण्यासारखे आहे. त्यामुळेच नाना राजकीय वर्तुळातील एक अजातशत्रू व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केले. 

आष्टीचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यातून आलेल्या हजारो चाहत्यांनी साहेबराव दरेकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छांचा वर्षाव करीत नानांचे अभिष्टचिंतन केले.

पुढे बोलताना महेबुब शेख म्हणाले की, राजकारणात संबंध कसे जपून ठेवावेत. हे नानांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या उपस्थितीवरुन पाहायला मिळते. आमदार असो किंवा नसो जनतेवर तितकच प्रेम करणारे असामान्य नेतृत्व म्हणजे नाना आहेत. या वयातही त्यांचा काम करण्याचा उत्साह पाहिला तर तरूणाईला लाजवणारा आहे. सध्या विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राजकारण चांगलेच तापू लागल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अनेकजण इच्छुक आहेत. त्यामध्ये नाना आणि मी देखील इच्छुक आहे. मात्र पवार साहेब ज्यांना कुणाला उमेदवारी देतील, त्या उमेदवाराला अधिकाधिक मतानं विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे शेख यांनी सांगीतले.

-------------------

याप्रसंगी हभप आदीनाथ आंधळे महाराज, हभप बबन महाराज बहिरवाल, माजी मंत्री शिवाजीराव पंडीत, माजी आमदार भीमराव धोंडे, जनार्दन तुपे, प्रा शशीकांत गाडे, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक हिंगे, माजी जिप सदस्य देवीदास धस, रामभाऊ खाडे, अण्णासाहेब चौधरी, किशोर हंबर्डे, अमोल तरटे, डाॅ मधूकर हंबर्डे, सुखलाल मुथ्था, डाॅ नदीम शेख, विक्रम पोकळे, राहूल काकडे, रिजवान शेख, मधू सायंबर, ठकाराम दुधावडे, विष्णूपंत घोलप, सागर आमले, नवनाथ आटोळे, सुनील सुर्यवंशी, केशव चव्हाण, संजय साके, बिपीन भंडारी, लक्ष्मण नन्नवरे, काकासाहेब सोनवणे, शिवभूषन जाधव, प्रदीप चव्हाण, सुभाष सोनवणे,प्रा झांजे, मनोज गाढवे, गंगाधर आजबे यांच्यासह अष्टी,पाटोदा व शिरुर तालुक्यातील दरेकरांचे चाहते पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय थोरवे यांनी केले. सुत्रसंचालन सिध्देश्वर शेंडगे, अमोल जगताप यांनी तर उपस्थितांचे आभार माजी शिक्षण सभापती उध्दव दरेकर यांनी मानले.

---------------

राजकारणातील परीस...

आष्टीच्या राजकारणात स्वच्छ अन् स्पष्टवक्ता म्हणून माजी आ साहेबराव दरेकरांचा नावलौकिक आहे. राजकीय प्रवासात आजपर्यंत नानांनी किंगमेकरची भूमिका साकारलेली. त्यांच्या स्पर्शाने अनेकांचे सोने झाल्यामुळे नाना म्हणजे राजकारणात लोखंडाचे सोने करणारा परीस आहेत.  - खा. निलेश लंके (अ.नगर)

-----------------

आमचं बंधुत्वाचं नातं.... राजकारणाच्या आखाड्यात दरेकर नानांच्या आमच्या दिशा जरी वेगवेगळ्या असल्या तरी आमच्यात पंचेचाळीस वर्षापासून अजूनही बंधुत्वाचं नातं आहे. राजकारणाच्या पलीकडे आमची दोघांची मैत्री आहे. आम्ही अनेक वर्षे सोबत काम केले. पण मैत्रीत कधीच राजकारण केले नाही. यावेळी धोंडेंनी नानांना पोषाख प्रदान अभिष्टचिंतन केले. - माजी आ. भीमराव धोंडे

-----------------

Post a Comment

0 Comments