पाथर्डी -
पाथर्डी शहरासह तिसगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गमध्ये घातलेल्या
दुभाजकाच्या भोवती मातीचे ढीगारे साचल्याने धूळीचे लोट उडून वाहन चालकांना मोठ्या
त्रासाला सामोरे जावे लागत असून दैनंदिन अपघात घडत आहेत. या गोष्टीकडे राष्ट्रीय
महामार्ग प्रशासन व सत्ताधारी व विरोधक पुढारी गंमत म्हणून पहात असून ऐन
निवडणुकीच्या तोंडावर मतदार संघात केवळ पोपटपंची गप्पा मारून जनतेला भुलवण्याचे
काम तथाकथित पुढारी करताना दिसून येत असल्याचा आरोप सामान्य जनतेतून होत आहे.
८ वर्ष
रखडलेल्या निर्मल नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्या दिव्यातून कसेबसे मार्गी
लागले. थोड्याफार प्रमाणावर अपघातांची मालिका कमी होते न होते तोच या कामाचे
ठेकेदार व देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेले राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या
हलगर्जीपणामुळे रस्त्यावरून वाहतुक करण्यात येणारे वाळू, खडी क्रश माती आदीच्या
वाहनातून सांडून पाथर्डी शहर व तिसगाव येथील भर बाजारपेठेत डिव्हायडर भोवती मातीचे
मोठमोठाले ढीग साचले आहेत. वर्षभरापासून हे साफ न केल्याने चार चाकी मोठी वाहने
गेल्यानंतर शहरातून धुळीचे लोट उठतात व पायी चालणारे प्रवासी व दुचाकीवरून प्रवास
करणारे प्रवासी यांच्या डोळ्यात ती धूळ उडून मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा
लागत आहे.
याशिवाय
बाजारपेठेतील भाजीपाला विकणारे शेतकरी खाद्यपदार्थ विकणारे हॉटेल चालक व इतर
दुकानदार यांच्या मालाची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून केवळ राष्ट्रीय
महामार्ग विभाग व पुढार्यांना शिव्या शाप देण्यापलीकडे सामान्य जनतेच्या
हातामध्ये काहीही नसल्याने जनता बेहाल झाली आहे.
याबाबत
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दिलीप उपविभागीय अभियंता दिलीप तारडे यांच्याशी
फोनवरून संवाद साधला असता त्यांनी त्यांची नुकतीच नाशिक येथे बदली झाल्याचे
सांगितले. नवीन उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्त झालेले एस.बी घटमळ यांच्याशी संपर्क
साधला असता त्यांनी दिलीगिरी व्यक्त करत येत्या चार ते पाच दिवसात सदरील माती
स्वच्छ केली जाईल असे आश्वासन दिले.
एकंदर विधानसभा
निवडणुकी निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपलेली असताना सत्ताधारी पुढारी व इच्छुक
उमेदवार सध्या मतदारसंघात दौऱ्यावर दौरे करत असून त्यांना अशी सामान्य जनतेच्या
हिताची कामे करण्यास वेळ मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सर्वोच्च
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ?
नवरात्र महोत्सव सुरू असून मोहटादेवी येथे अहमदनगर शेवगाव यासह राज्यातून पायी प्रवास करत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सदरील राष्ट्रीय महामार्गावर बारीक वाळू खडी व माती यांचे खच साजल्याने धुळीचे लोट व टोकदार लहान दगड भाविकांच्या पायात घुसून त्यांना इजा होत आहे. याउलट ुढार्यांनी मात्र स्वतःची जाहिरात करण्यासाठी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना फ्लेक्स कमानी उभा केलेल्या दिसून येत आहेत. याबाबत प्रशासनाकडे चौकशी केली असता कोणत्याही जाहिरातीची व कमानीची ुढार्यांनी परवानगी न घेतल्याचे समजते. यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सर्व पक्षांकडून शहराचे विद्रूपीकरण होणार नाही अशा पद्धतीने जाहिरात करू नये या बाबत अमलबजावणी करण्याचे आदेशित केलेले आहे व तशा स्वरूपाचे प्रतिज्ञापत्र देखील सर्व पक्षांकडून घेतलेले आहे. मात्र तरी देखील सर्वपक्षीय पुढारी चमकोगिरी करताना करण्यासाठी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावून जाहिरात बाजी करत आहेत. याशिवाय शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर फळ विक्रेते यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटल्याने चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत पोलीस व पालिका प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलण्या पलीकडे काहीच करताना दिसून येत नाहीत.त्यामुळे नागरीकामधून महामार्ग विभाग व पुढारी यांच्या भुमिके बद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
0 Comments