वैजू बाबुळगाव येथील शेतकरी अमोल भाऊसाहेब
फुलशेटे व सौ शिवमाला अमोल फुलशेटे यांनी त्यांच्या विहिरीतील पाणी घेण्यास भावकीतील
लोक अडथळा करत असल्याबाबत पाथर्डी पोलिसाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या मात्र
कारवाई होत नसल्याने विहिरीतील पाणी घेण्याबाबत कोणीही अडथळा करू नये म्हणून पोलीस
कारवाई होण्यासाठी दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी पोलीस अधीक्षक अहमदनगर, तहसीलदार
पाथर्डी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री,जिल्हाधिकारी अहमदनगर,मुख्यमंत्री सचिव कक्ष
जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्याकडे रीतसर निवेदन सादर करून संबंधित लोकांवर
कारवाई होण्यासाठी योग्य ती कारवाई होण्यास मागणी केली होती मात्र सदर निवेदनाची
दखल न घेतल्याने १७ ऑक्टोबर २०२४ रोजी तहसील कार्यालय पाथर्डी या ठिकाणी फुलशेटे
कुटुंबीय उपोषणास बसले होते.
सायंकाळी
५ वाजल्याच्या सुमारास उपोषण ठिकाणी तहसीलदार उद्धव नाईक हे आले व त्यांनी सांगितले
उपोषण करू नका तुम्ही तात्काळ उठा त्यानंतर साधारण ५.३० वाजण्याच्या सुमारास पाथर्डी
पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई १) भगवान मधुकर सानप २) लक्ष्मण सुखदेव पोटे ३) महिला
पोलीस शिपाई अंजू विष्णु सानप ४) कुसाळकर पूर्ण नाव माहित नाही असे आंदोलन ठिकाणी
आले व त्यांनी आंदोलकांना कॉलरला पकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात
केली. दोघा पती-पत्नी तहसील कार्यालय या ठिकाणाहून पोलीस ठाण्यात ओढत ओढत नेले.
त्या ठिकाणी एका खोलीत नेऊन दोघांना वरील तीनही पोलीस व इतर पाच ते सहा पोलिसांनी
लाथा बुक्क्यांनी तोंडात कपडा कोंबून जोरजोरात मारहाण केली बटरीच्या
आकाराच्या काळ्या रंगाच्या वस्तूने जोराचे विजेचे शॉक दिले, खोलीत जवळपास एक तासभर
कोंडून ठेवले, गाडीत टाकून दवाखान्यात नेले,वैद्यकीय तपासणी झाली त्या ठिकाणी मार
व जखमा यावर औषध उपचार करून आंदोलकांना भगवान सानप यांनी त्याच्या कमरेला असलेले
पिस्तूल दाखवले व पुन्हा पोलीस ठाण्यात आल्यास गोळ्या घालून ठार मारू त्यानंतर
औषधोपचार व आराम करून आंदोलक पुन्हा वरील तीनही पोलिसांविरुद्ध तक्रार देण्यासाठी
पाथर्डी पोलीस ठाण्यास दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ रोजी गेलो असता फिर्याद नोंदवून
घेतली नाही व तक्रारी केल्यास तुमच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून तुम्हाला जेलमध्ये
टाकू अशी धमकी दिली.चारही पोलिसांनी विनाकारण मारहाण केली असून त्यामुळे आमच्या
मानवी हक्कांचे उल्लंघन झाले असल्याबाबत मानवी हक्क आयोग व गृह विभागाकडे तक्रार
दाखल करण्यात आली आहे.
0 Comments