भजनी मंडळांना भजन साहित्य,नीलेश लंके प्रतिष्ठानचा पुढाकार !


पारनेर : प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर-नगर मतदारसंघातील विविध गावांच्या २०० भजनी मंडळांना भजन साहित्याची भेट देण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता भजनी मंडळांना या साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. 

भजन साहित्य वितरणाच्या कार्यक्रमास पारनेर तालुक्याचे भुषण राज्य शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार प्राप्त वैराग्यमुर्ती हभप डॉ. नारायण महाराज जाधव हे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते या साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. 

शुक्रवार दि.११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता हंगे येथील दत्त मंदिरानजीकच्या नविन सामाजिक सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खा. नीलेश लंके व जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या राणीताई लंके हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

      पारनेर नगर मतदारसंघातील वारकरी सांप्रदायासाठी आतापर्यंत खा. नीलेश लंके तसेच राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आतापर्यंत मतदारसंघातील भजनी मंडळांच्या मागणीनुसार भजन साहित्य देण्यात आलेले आहे. भजन मंडळांची मागणी वाढल्यानंतर गावोगावच्या भजनी मंडळांना साहित्य वितरण करण्याचा निर्णय खा. लंके व राणीताई लंके यांनी घेतला. लंके दाम्पत्याच्या निर्णयानंतर प्रतिष्ठानच्या वतीने भजन साहित्य खरेदी करण्यात आले असून शुक्रवारी त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पारनेर-नगर मतदारसंघातील नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

हे साहित्य मिळणार  -

पखवाज, पेटी व विना प्रत्येकी एक व १० टाळ प्रत्येक भजनी मंडळास देण्यात येणार आहे. हे साहित्य घेण्यासाठी येणाऱ्या भजन मंडळातील सदस्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार असून त्यांच्यासाठी मिष्ठान्न भोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे. 

आषाढी वारीत अल्पोपहार -

पंढरीच्या आषाढी वारीमध्येही नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांची दरवर्षी सेवा केली जाते. फराळ, बाटलीबंद पाणी तसेच आरोग्य सेवा पुरविण्यात येते. यंदा बाटलीबंद पाणी, आरोग्यसेवेसह गरमागरम वडापाव वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments