पाथर्डी - शहरात जागतिक मधुमेह दिनाचे निमित्ताने गजानन हॉस्पिटल आणि मधुमेह विकार उपचार केंद्र तसेच पाथर्डी तालुका डॉक्टर असोशिअशन,निमा संघटना यांच्या वतीने शहरातून मधुमेह विकार जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांच्या वतीने मधुमेह विकार तसेच रक्तदाब यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गजानन हॉस्पिटल आणि मधुमेह विकार उपचार केंद्र यांच्या वतीने मोफत शुगर,रक्तदाब तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असून त्यास मोठा प्रतिसाद लाभत आहे. यावेळी डॉ सुरेखा लोखंडे, डॉ.दीपक देशमुख,डॉ.शिरीष जोशी,डॉ सुहास उरणकर,डॉ.सचिन गांधी, डॉ.अभीजीत आव्हाड,डॉ.अभय आव्हाड डॉ. श्रीधर देशमुख डॉ. राजेंद्र खेडकर डॉ दीपक जायभाय डॉ जयश्री आव्हाड डॉ अंबिका वाघ डॉ भगवान दराडे,डॉ विनय फड,डॉ अभंग आदीसह तालुक्यातील बहुसंख डॉक्टरानी मधुमेह जनजागृती फेरीत मार्गदर्शन व जनजागृती केली.
0 Comments