स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने सत्संग मेळावा !

 

पाथर्डी - येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित तालुकास्तरीय भव्य सत्संग मेळाव्याचे आज रोजी आयोजन करण्यात आले आहे. 

परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे गुरुपुत्र युवा संत आदरणीय श्री चंद्रकांत दादासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी दुपारी ५ वाजता सदरील सत्संग मेळाव्याचे आयोजन पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान येथे करण्यात आले असून पाथर्डी तालुक्यातील स्वामी समर्थ सेवेकऱ्यांच्या वतीने या मेळाव्याचे भव्य दिव्य तयारी करण्यात आली आहे. 

या मेळाव्यात श्री चंद्रकांत दादासाहेब मोरे गुरुमाऊली हे भाविक भक्तांना विविध विषयावर अध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत.आयुर्वेद, अध्यात्म वास्तुशास्त्र स्वयंरोजगार हस्तशास्त्र ज्योतिष शास्त्र भारतीय अस्मिता मानवांच्या विविध समस्या या बाबीवर प्रबोधनात्मक सत्संग मार्गदर्शन आयोजन करण्यात आले आहे. 

यावेळी मोफत आरोग्य शिबिर मोफत औषध वाटप महा वस्त्रदान अन्नदान स्वच्छता अभियान यासारखे उपक्रम राबवले जात आहेत.

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग पाथर्डी तालुका यांच्यावतीने आज दिनांक 3 डिसेंबर 2024 मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वीर सावरकर मैदान भाजी बाजारतळ या ठिकाणी होणाऱ्या सत्संग मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments