पाथर्डी - नदीजोड योजनेच्या माध्यमातून जायकवाडी
व मुळा धरणातून उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेती सिंचनासाठी
गोदावरी खोरे पसिसरात 80 टी.एम.सी. पाणी वळविण्याचे शासनस्तरावर प्रस्तावीत असून या योजनेत
पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील गोदावरी खोरे परिसरातील कायम दुष्काळी गावांचा
सामावेश करण्यात यावा अशी मागणी आमदार मोनिकाताई राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांचेकडे केली आहे.
सध्या नागपूर येथे राज्य विधीमंडळाचे
हिवाळी अधिवेशन सुरु असून आमदार राजळे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची समक्ष भेट घेवून याबाबत त्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेवगांव-पाथर्डी
विधानसभा मतदासंघात शेवगांव व पाथर्डी या दोन तालुक्यांचा समावेश आहे. शेवगांव
तालुक्याचा पूर्व भाग असलेल्या बोधेगांव परिसरातील 25 ते 30 गावे तसेच पाथर्डी तालुक्यातील भालगांव, माणिकदौंडी, कोरडगांव व
माळीबाभुळगांव परिसरातील अनेक गावे दुष्काळी असून या गावांना कायमस्वरुपी शाश्वत
असा कोणताही पाण्याचा स्त्रोत नाही. सतत असलेली दुष्काळी परिस्थीती व पाण्याचा
स्त्रोत नसल्यामुळे या दोन्ही तालुक्यात ऊसतोड मंजूराची संख्या मोठी आहे. दोन्ही
तालुक्यातील गोदावरी खोरे पाणलोट परिसरात असलेल्या वंचित गावांत पाणी उपलब्धतेबाबत
भविष्यासाठी कोणताही आराखडा अद्याप मंजूर नाही. त्यामुळे या गावांतील नागरीक
वेळोवेळी शेतीच्या सिंचनासाठी शाश्वत व हक्काचे पाणी मिळावे यासाठी अनेक
वर्षांपासून मागणी करत आहेत.
शासनस्तरावर नदीजोड योजनेच्या
माध्यमातून गोदावरी खोऱ्यामध्ये 80 टी.एम.सी. पाणी वळविण्याचे प्रस्तावीत आहे. तरी प्रस्तावीत
असलेल्या व वळविण्यात येणाऱ्या पाण्यामधून पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील गावांना कायमस्वरुपी
दुष्काळावर मात करण्यासाठी जायकवाडी धरणातून व मुळा धरणातून उपसासिंचन योजना
राबविल्यास पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील वंचित गावे कायमस्वरुपी दुष्काळ मुक्त
होवून शेतीपूरक व्यवसायातून युवकांना रोजगार निर्माण होईल. त्यामुळे शेवगांव व
पाथर्डी तालुक्यातील वंचित गावांना नदीजोड योजनेच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात
उपलब्ध होणा·या पाण्याचा लाभ मिळावा, यासाठी शासनस्तरावर निर्णय व्हावा अशी
विनंती आमदार राजळे यांनी निवेदनात केली आहे.
0 Comments