तुच सावित्री,तुच जिजाई ! तुच अहिल्या,तुच रमाई !


 

पाथर्डी - महिला दिनाचे औचित्य साधून संघर्ष महिला बचत ग्रुपच्या ६५ भगिनींचा सन्मान सोहळा माजी उपनगराध्यक्ष दिपाली रामनाथ बंग मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

बचत गटाच्या महिलांचा सन्मान देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष रामदासजी कांबळे, सचिव किशोरजी पारखे, दिनेश कुरकुटे,अशोक कोकाटे,संतोष चिनके या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक रामनाथ बंग हे होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना रामनाथ बंग म्हणाले राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिल्यादेवी होळकर रमाबाई आंबेडकर देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी माजी परराष्ट्रमंत्री स्व. सुषमा स्वराज विद्यमान राष्ट्रपती द्रोपदी मुर्म या महिलांनी देशात स्त्री शक्तीच नेतृत्व केलं. संघर्ष महिला बचत गट सुद्धा पाथर्डी शहरातील सामाजिक धार्मिक शैक्षणिक चळवळीत अत्यंत मोलाचा कार्य करीत आहे. संघर्ष महिला बचत गट शहरात होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात सक्षमपणे कार्य करीत आहे. असे गौरव उदगार बंग यांनी काढले. कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यासाठी मधुरा बंग, आलोक बंग, योगेश कलंत्री यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुश्री भंडारी यांनी केले. सूत्रसंचालन भारतीताई आसलकर यांनी केले तर आभार सुनिता ताई उदबत्ते यांनी मानले.

Post a Comment

0 Comments