पाथर्डी - पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील रोहीत्रांची क्षमता वाढ करणे.
शेतीपंप व सिंगल फेज योजनेत नवीन गाव, वाडया-वस्त्यांचा
समावेश करणे. आर.डी.एस.एस. योजनेअंतर्गत ओव्हरलोड रोहीत्रांची क्षमता वाढ करुन
तेथे नवीन रोहीत्र टाकणे. त्याचबरोबर उपकेंद्राची क्षमता वाढ करणे. व मंजूर
मजलेशहर, अमरापुर, जवखेडे खालसा या मंजूर उपकेंद्राची निविदा प्रक्रिया करुन तातडीने
काम सुरु करणेबाबत बैठकीत चर्चा झाली असून सर्व मागण्यास ना. बोर्डीकर यांनी
सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहीती आमदार राजळे यांनी दिली.
विधानसभा मतदारसंघातील विजेच्या समस्येबाबत सोमवार दि. 24/03/2025 रोजी ऊर्जा राज्यमंत्री ना.
मेघनाताई बोर्डीकर-साकोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्मल भवन, मुंबई येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे बैठक घेण्यात आली. यावेळी आ. राजळे यांनी मतदारसंघातील विजेच्या प्रश्नावर ना. बोर्डीकर यांच्याकडे
मतदारसंघातील रोहीत्रांची क्षमता वाढ करणे. शेतीपंप व सिंगल फेज योजनेत नवीन गाव, वाडया-वस्त्यांचा समावेश करणे. आर.डी.एस.एस. योजनेअंतर्गत ओव्हरलोड
रोहीत्रांची क्षमता वाढ करुन तेथे नवीन रोहीत्र टाकणे. त्याचबरोबर उपकेंद्राची
क्षमता वाढ करणे. व मंजूर मजलेशहर, अमरापुर, जवखेडे खालसा या मंजूर उपकेंद्राची निविदा प्रक्रिया करुन तातडीने
काम सुरु करण्यात यावे तसेच रिक्त असलेल्या उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता ही पदे तातडीने भरणे आदी मागण्या करण्यात आल्या
ना. बोर्डीकर यांनी या सर्व मागण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आ. राजळे यांनी
सांगितले.
यावेळी ऊर्जा विभागाचे संचलन संचालक अरविंद भादीकर, प्रकल्प संचालक प्रसाद रेश्मे, कार्यकारी संचालक वितरण
दत्तात्रय पडळकर, पायाभुत आराखडा कार्यकारी संचालक धनंजय औढेंकर, मुख्य अभियंता पंकज तगडपल्लीवार, मुख्य अभियंता अंकुर
कावळे, अधिक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता
लक्ष्मण काकडे आदी उपस्थीत होते.
0 Comments